By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 11, 2019 05:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एनडीए सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर अयोध्येत राम मंदीराच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विजयी खासदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी त्यांना टोला लगावला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय असल्याचे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राम मंदीरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 16 जूनला आपल्या खासदारांना घेऊन अयोध्येत रामललाचे दर्शन घेतील. मंदीर निर्माणाची योग्य वेळ आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या नेतृत्वात अयोध्येत राम मंदीराचे निर्माण होणार असल्याचे राऊत म्हणाले. ही काही श्रेय घेण्याची लढाई नाही. देशाने मोदींना निवडले आहे. आम्ही त्यांचे ऐकू. आता तेच आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहेत.संजय राऊत यांनी सोमवारी मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांची भेट घेतली.
येत्या १७ जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मुंबईतील ताडदेव ....
अधिक वाचा