By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 24, 2019 01:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपला चांगले यश मिळाले. यानंतर काही वेळेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नावापुढील 'चौकीदार' हा टॅग काढून टाकला आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील आपल्या नावापुढील चौकीदार टॅग काढण्यास सांगितले आहे.
नावापुढील चौकीदार हे टॅग हटवलं असले तरी, चौकीदार म्हणून असलेली भावना कमी होणार नाही, असे देखील मोदी म्हणाले. तसेच चौकीदारी ही भावना पुढे नेण्याची वेळ आली आहे, असेही मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार या शब्दाचा वापर केला होता. गांधीच्या या टीकेला चोख प्रत्त्युतर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने ट्विटर अंकाऊंटवर आपल्या नावापुढे चौकीदार नावाचा टॅग जोडला होता.
चौकीदार आणि वाद
चौकीदार या टॅगमुळे अनेक वाद देखील पाहायला मिळाले. मोदींच्या मै भी चौकीदार या अभियानाला भाजपच्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पंरतु त्यांचेच खासदार असलेले सुब्रमण्यम स्वामी यांनी नावापुढे चौकीदार टॅग लावण्यास नकार दिला होता. मी ब्राह्मण आहे, मी नावापुढे चौकीदार लावणार नाही म्हणत त्यांनी याला नकार दिला होता.
तसेच महाराष्ट्राच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या नावापुढे चौकीदार टॅग लावला नव्हता. याबद्दल त्यांना एका मुलाखतीत विचारले असते, माझ्यामुळे पंतप्रधानांच्या अभियानावर काही नकारात्मक परिणाम होऊ नये, यासाठी मी चौकीदार हा टॅग लावला नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा एकदा दारूण पराभव झाला. काँग्रेस अध्यक्....
अधिक वाचा