ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंतप्रधान मोदींचा 70वा वाढदिवस, 'या' कार्यक्रमांचं आयोजन!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 17, 2020 11:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पंतप्रधान मोदींचा 70वा वाढदिवस, 'या' कार्यक्रमांचं आयोजन!

शहर : देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी यांचा जन्म 17 सप्टेबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगरमध्ये झाला होता. मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 14 सप्टेंबरपासून भाजप एक आठवड्याचं सेवा कार्य करत आहे. राष्ट्रीय स्तरापासून राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर सेवा कार्य केले जात आहे.

भाजपने पंतप्रधान मोदींच्या 70व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुका पातळीवर किमान 70 गरजूंची सेवा करण्याचे निर्देश दिले आहेत. दिव्यांगांसाठी शिबिर आयोजित करुन त्यांना आवश्यक उपकरणं दिली जातील. प्रत्येक जिल्ह्यातील 70 ठिकाणी स्वच्छतेचा कार्यक्रम, फळांचं वितरण, रुग्णालयातील रुग्णांची देखभाल आणि रक्तदान असे कार्यक्रम होणार आहेत.याशिवाय भाजप कार्यालयात आज सकाळी दहा वाजता कार्यकर्ते केक कापणार आहेत. तर आज दुपारी चार वाजता चांदनी चौकमध्ये एका कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दिव्यांगांना 70 उपकरण वितरित करणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांकडून दुपारी 12 वाजता एक व्हर्च्युअल कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.30 वाजता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, डॉ जितेंद्र सिंह आणि भाजप खासदार मनोज तिवारी विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने पाकिस्तानहून आलेल्या हिंदू शरणार्थींना मजलिस पार्क कॅम्प, आदर्श नगर, नवी दिल्लीत शिलाई मशीन, -रिक्षा आणि जेवणाच्या वस्तूंचं वितरण करतील. तर नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाआधी तामिळनाडूच्या भाजप कार्यकर्त्यांनी 70 किलोंचा लाडू श्री कामाक्षी अम्मन मंदिरात अर्पण केला. त्यानंतर तो कोईंबतूरमधील लोकांना वाटला.मागच्या वाढदिवसाला पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये गेले होते. सरदार सरोवर धरणावरील नर्मदा देवीच्या महाआरतीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तर 68वा वाढदिवस त्यांनी आपला मतदारसंघ वाराणसीमध्ये साजरा केला होता.

नरेंद्र मोदी यांना सहा भावंडं आहेत. मोदींना एक मोठी बहिण आणि दोन मोठे भाऊ आहेत. तर दोन धाकटे भाऊ आणि एक लहान बहिण आहे. सर्वात मोठ्या बहिणीचं नाव शारदाबेन, त्यानंतर भाऊ सोमभाई, अमृतभाई. नरेंद्र मोदींपेक्षा लहान असलेल्या भावाचं नाव प्रह्लादभाई, त्यानंतर बसंतीबेन आणि मग पंकज मोदी आहे.

पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासावर एक नजर...

गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांचा प्रवास आहे. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. बालपणापासूनच त्यांचा ओढा संघाकडे होता आणि गुजरातमध्ये आरएसएसचा मजबूत आधारही तेच होते. 1967 मध्ये वयाच्या 17 वर्षी ते अहमदाबादला आले आणि त्याच वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य बनले. यानंतर 1974 मध्ये ते नवनिर्माण आंदोलनात सहभागी झाले. अशाप्रकारे सक्रिय राजकारणात येण्याआधी नरेंद्र मोदी अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रचारक होते.

2001 मध्ये पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनले!

2001 मध्ये केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजरातचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं. डिसेंबर 2002 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी विजय मिळवला होता. यानंतर 2007 च्या विधानसभा निवडणुका आणि मग 2012 मध्येही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपने गुजरातमध्ये निवडणुका जिंकल्या. त्यांच्याच कार्यकाळात गोध्रा जळीतकांडही घडलं होतं.

2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान

तर 2014 मध्ये ते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. एकट्या भाजपने 282 जागांवर विजय मिळवला होता. एवढंच नाही तर उमेदवार म्हणून मोदींनी वाराणसी आणि वडोदरा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दोन्ही मतदारसंघात त्यांचा विजय झाला. मात्र 2019 मधील लोकसभा निवडणुकीतील विजय 2014 पेक्षा फारच मोठा होता. या निवडणुकीत भाजपने तब्बल 303 जागांवर विजय मिळवला. 30 मे 2019 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

मागे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. नितीन गडकरी यांन....

अधिक वाचा

पुढे  

पोलीस भरती म्हणजे मराठा समाजाला चिथावणी: संभाजी राजे
पोलीस भरती म्हणजे मराठा समाजाला चिथावणी: संभाजी राजे

महाराष्ट्र सरकारनं काढलेल्या पोलीस भरतीला खासदार संभाजी राजे यांनी विरोध ....

Read more