By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 09, 2019 11:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे - दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात महासंचालकांच्या परिषदेसाठी गेले असताना काल ही परिषद संपन्न झाली. त्यानंतर पंतप्रधान नवी दिल्लीला रवाना न होताच अचानक आपल्या कार्यक्रमात बदल करत ते माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शहरातल्या रुबी हॉस्पीटलमध्ये गेले. तिथे त्यांनी शौरी यांची भेट घेतली आणि गप्पाही केल्या. त्याचे फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केलेत.
In Pune, I met former Union Minister Arun Shourie Ji. Enquired about his health and had a wonderful interaction with him.
— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2019
We pray for his long and healthy life. pic.twitter.com/arjXSUoirf
दरम्यान, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना विख्यात पत्रकार असलेले अरुण शौरी हे मंत्रिमंडळात होते. वाजपेयींचं सरकार गेल्यानंतर त्यांचा भाजपशी संबंध तुटला होता. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शौरींना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र, तसं न होता उलट शौरी आणि मोदी यांचे संबंध बिघडले होते. शौरींना नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका केली होती. राफेल प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मोदींच्या आर्थिक धोरणांवरही त्यांनी सातत्याने टीका केली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे शौरींच्या भेटीला जाणं याला वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं दिसून आलय.
“माझा पक्ष सोडण्याचा विचार नसला तरी जाणीवपूर्वक काही लोकांकडून माझा अपमा....
अधिक वाचा