ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दहशतवादाचं शस्र 'आयडी' तर लोकशाहीचं 'वोटर आयडी', मतदानानंतर मोदींची प्रतिक्रिया

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 23, 2019 09:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दहशतवादाचं शस्र 'आयडी' तर लोकशाहीचं 'वोटर आयडी', मतदानानंतर मोदींची प्रतिक्रिया

शहर : ahmedabad

लोकसभा निवडणूक २०१९ च्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतंय. या टप्प्यात देशभरातील तब्बल ११७ जागांसाठी मतदान सुरू झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आजच्या या मतदानासाठी खास उत्सुक आहेत. त्याचं कारण म्हणजे आज ते स्वत: मतदानाचा हक्क बजावत आहेत. आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मंगळवारी सकाळीच अहमदाबादमध्ये दाखल झाले. इथं त्यांनी रानिपमधून आपला मतदानाचा अधिकार बजावला.

सक्रीय भागीदारी करण्याचं सौभाग्य मिळालं. कुंभमेळ्यात स्नान करून पवित्र जो आनंद मिळतो, तोच आनंद मला मतदानाचा पवित्र अधिकार बजावून मिळतो. ज्या ज्या ठिकाणी अजूनही मतदान बाकी आहे त्या त्या ठिकाणच्या देशातल्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी एका उत्सवाच्या स्वरुपात उत्साहात मतदान करा. भारताचं मतदान समजूतदार आहे. आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तरुणांना मतदान करायचं आहे. दहशतवादाचं शस्र आयडी असतं मात्र लोकशाहीचं शस्र 'वोटर आयडी' असतं', अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानानंतर नोंदवलीय.

'सुपर इंग्लिश स्कूल'मधल्या मतदान केंद्रावर पंतप्रधान मोदी मतदानसाठी दाखल झाले. इथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदानानंतर बाहेर पडलेल्या मोदींना पाहण्यासाठी रस्त्यावर उपस्थित राहिलेल्या लोकांनी 'मोदी-मोदीं'च्या घोषणा दिल्या. खुल्या जीपमधून मतदान केंद्रावर दाखल झालेल्या पंतप्रधान मोदींचं स्वागत करण्यासाठी खुद्द भाजपाध्यक्ष अमित शहा उपस्थित राहिले. यावेळी अमित शहा आपल्या कुटुंबीयांसोबत हजर होते. अमित शहा यांची चिमुरडी नातही आपल्या आजोबांसोबत आली होती. मतदानासाठी दाखल झालेल्या पंतप्रधान मोदींनी या चिमुरडीला आपल्या हातात घेऊन आशीर्वाद दिले.  

सर्वात अगोदर त्यांनी आपल्या अहमदाबादमधील घरी जाऊन आईचा आशीर्वाद घेतला.यावेळी मोदींच्या आई हीराबेन यांनी पंतप्रदान मोदी यांना दुर्गामातेची ओढणी भेट म्हणून दिली तसंच मोदींना टिळा लावून आशीर्वादही दिले.

मतदान करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं. 'भविष्यातील देशाची दिशा निश्चित करण्यासाठी तुमचं मत हे अत्यंत महत्त्वाचं आहे' असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.

तिसऱ्या टप्प्याचं वैशिष्ट्य म्हणजे या टप्प्यात भाजपा आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्या मतदारसंघात मतदान होतंय. भाजपाध्यक्ष अमित शाह गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. या मतदार संघात आज मतदान होणार आहे. तर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या उत्तर प्रदेशातील मैनपुरीत आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या गुलबर्गा मतदारसंघात मतदान होतंय. त्यामुळे दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे.

 

 

मागे

राहुल गांधींच्या अंगावर स्फोटके बांधून दुसऱ्या देशात सोडा- पंकजा मुंडे
राहुल गांधींच्या अंगावर स्फोटके बांधून दुसऱ्या देशात सोडा- पंकजा मुंडे

भारतीय वायूदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राई....

अधिक वाचा

पुढे  

बारामती आमचीच, म्हणत सुप्रिया सुळे, अजित पवारांचं मतदान
बारामती आमचीच, म्हणत सुप्रिया सुळे, अजित पवारांचं मतदान

राज्यातल्या १४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ....

Read more