ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एच.डी.देवेगौडा पंतप्रधान व्हावेत; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले मत

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 06:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एच.डी.देवेगौडा पंतप्रधान व्हावेत; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले मत

शहर : मुंबई

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर एच.डी.देवेगौडा हे पंतप्रधान व्हावेत, असे मत व्यक्त केले. तसेच शरद पवारांना मी पंतप्रधानपदाच्या लायक मानत नाही. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि केसीआर हे देखील कधीच पंतप्रधान होणार नाहीत, असेही आंबेडकर म्हणाले.
यंदाच्या निकालात भाजपला 148 ते 200 जागा तर काँग्रेसला 100 पर्यंत जागा मिळतील, असे भाकीतही आंबेडकरांनी केले. महाराष्ट्रातील लोकसभेसाठीचे संपूर्ण मतदान पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता पंप्रधान कोण होणार ? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोघांपैकी कोणीही पंतप्रधान होणार नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती या पंतप्रधानपदाच्या उमेदवार असल्याचे एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. यावर प्रकाश आंबेडकरांनी मत व्यक्त केले आहे.

मागे

युपीए कार्यकाळातील ‘6 सर्जिकल स्ट्राईक’ची यादी जाहीर !
युपीए कार्यकाळातील ‘6 सर्जिकल स्ट्राईक’ची यादी जाहीर !

युपीए सरकार सत्तेत असतानाही अनेक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते. परंतु, ....

अधिक वाचा

पुढे  

अनिल अंबानींच्या घराबाहेर चौकीदारांची रांग, नरेंद्र मोदींचा प्रथम क्रमांक - राहुल गांधी टीका
अनिल अंबानींच्या घराबाहेर चौकीदारांची रांग, नरेंद्र मोदींचा प्रथम क्रमांक - राहुल गांधी टीका

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ....

Read more