By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2019 10:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात सत्तास्थापनेचा पेच अद्याप कायम आहे. निवडणुकांचा निकाल लागल्यापासून आतापर्यंत दिवसेंदिवस मुंबईसह राज्यभरातील वातावरण चांगलंच (Police On political duty) तापलं आहे. राष्ट्रपती राजवटीनंतरही अनेक आमदार आणि नेते अलिशान जिंदगी जगत आहेत. तर दुसरीकडे या आमदारांच्या सुरक्षेसाठी असणारे पोलीस मात्र रस्त्यावरच दिवस काढताना दिसत (Police On political duty) आहेत.
एकीकडे आपले आमदार सांभाळण्यासाठी आणि पक्षाच्या बैठकीसाठी दररोज लाखो रुपयांचा चुराडा केला जात आहे. तर दुसरीकडे याच आमदारांच्या सुरक्षेसाठी तसेच जनतेच्या सुरक्षेसाठी बाहेरुन मागवण्यात आलेल्या पोलिसांचे आणि SRPF जवानांचे हाल सुरु आहेत.सलग 35 किंवा त्याहूनही अधिक तास कर्तव्य बजावूनही या पोलिसांचे खाणे-पिणे तर सोडाच, पण साधं आराम करण्याचीही पुरेशी तजवीज प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. यातच बाहेरून आलेल्या SRPF जवानांना जनावरांच्या कोंदवाड्यासारख अक्षरश: कोंडण्यात आलं आहे.
कुर्ला ब्रिजखाली झोपडीवजा असणाऱ्या या खोलीत गाड्यांचा कलकलाट, डासांपासून वाचण्यासाठी अनेक पोलिस शांत झोपल्याचे चित्र ‘टीव्ही 9 मराठी’ च्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. विशेष म्हणजे पोलिस झोपलेले असलेल्या खोली शेजारीच सार्वजनिक शौचालय आहे. त्यामुळे या खोलीत प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. मात्र तरीही दिवसभराचा ताण, थकवा, क्षीण यामुळे पोलिस दलही शांत झोपी गेलं आहे.
राज्यात एकीकडे युतीत असणारे भाजप-शिवसेना मित्रपक्षांचे गणित बिघडले आहे. तर दुसरीकडे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले गेलेले शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत संकेत मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपला एकही आमदार फुटू नये यासाठी त्यांना एकत्रित आणत काळजी घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला शिवसेनेने रंगशारदा तर दुसऱ्या दिवशी द रिट्रीट या अलिशान हॉटेलमध्ये आमदारांची सोय केली.त्यापाठोपाठ काँग्रेसनेही आपल्या सर्व आमदारांची जयपूरमधील एका अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली. एवढंच नाही, तर सत्तास्थापनेच्या हालचालीची प्रत्येक बैठक ही कधी ट्रायडंट, तर कधी ताज लँडसारख्या फाईव्ह स्टार किंवा 7 स्टार हॉटेलमध्ये पार पडत आहे. यामुळे पोलिस प्रशासनाचे मात्र हाल होताना दिसत आहे
“माननीय अमित शाह म्हणतात की पंतप्रधान मोदी सभेत बोलत होते फडणवीसच मुख्यम....
अधिक वाचा