By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 17, 2020 03:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठा आरक्षणाच्या १३ टक्के जागा रिक्त ठेवून पोलीस भरती करावी. अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. राज्य सरकारने कालच १२५२८ पोलिसांची भरती करण्याचे जाहीर केली आहे. मात्र मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पोलीस भरतीत मराठा तरुणांची संधी हुकणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या १३ टक्के जागा बाजूला ठेवून इतर पदांसाठी पोलीस भरती करण्याची मागणी मेटे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
पोलीस भरतीत 13% जागा मराठा समाजासाठी बाजूला काढता येतील का, हे कायद्यानुसार तपासू. राज्य सरकाराचा मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे. असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 17, 2020
महाराष्ट्र सरकारनं काढलेल्या पोलीस भरतीला खासदार संभाजी राजे यांनी विरोध ....
अधिक वाचा