ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आपल्या देशात चमच्यांची कमी आहे का? - नितीन गडकरी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 16, 2019 12:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आपल्या देशात चमच्यांची कमी आहे का? - नितीन गडकरी

शहर : मुंबई

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी प्रशासकीय कामकाज आणि राजकीय कामाच्या पद्धतींवर अगदी खुलेपणाने आपली मतं व्यक्त करत असतात. आता त्यांनी बांबूच्या चमच्यांच्या आयातीवरुन पुन्हा एकदा खुशामत करणाऱ्यांवर कटाक्ष टाकला. यावेळी गडकरींनी एकदा आपण देशात चमच्यांना कमी आहे का? असं विनोदाने विचारल्याची आठवण सांगितली.नितीन गडकरी म्हणाले, “आपल्या देशात बांबूच्या चमच्यांचं उत्पादन होत नव्हतं. आपण चीनवरुन बांबूपासून तयार होणारे चमचे आयात करत होतो. तेव्हा मी विनोद म्हणून आपल्या देशात चमच्यांची कमी आहे का? असं म्हटलं होतं.”

संरक्षण विभागात 8 वर्षे फाईल फिरते, मंजूर होते तेव्हा उपयोग संपलेला असतो

नितीन गडकरी संरक्षण विभागाच्या लालफितीच्या कारभारावरही तोशेरे ओढले. संरक्षण विभागात एखाद्या प्रस्तावाची फाईन आठ-आठ वर्षे फिरत राहते. जेव्हा ती फाईल मंजूर होते, तेव्हा ज्या उत्पादनासाठी परवानगी मागितली जाते ते उत्पादन कालबाह्य झालेलं असतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

बसेस सीएनजीवर चालल्या, तर तोटा कमी होईल

नितीन गडकरी यांनी नेहमीच सीएनजी आणि बायोडिझेलच्या वापराची आग्रही मागणी केली आहे. सध्या नागपूर महानगरपालिकेचा वार्षिक तोटा 60 कोटींचा आहे. यावर बोलताना त्यांनी पालिकेने आपल्या बसेस सीएनजीवर चालवल्या, तर हा तोटा कमी होऊ शकतो, असं मत व्यक्त केलं.

मागे

राज्यात नवीन समीकरण? भाजपसमोर शरद पवार हाच एकमेव पर्याय
राज्यात नवीन समीकरण? भाजपसमोर शरद पवार हाच एकमेव पर्याय

राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्र....

अधिक वाचा

पुढे  

आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन, भाजप-शिवसेना आता आमने-सामने
आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन, भाजप-शिवसेना आता आमने-सामने

संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात महत्त्वाचे व....

Read more