ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकसभा निवडणुक : मुलांकडून घोषणाबाजी, किरण खेर अडचणीत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 04, 2019 03:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकसभा निवडणुक : मुलांकडून घोषणाबाजी, किरण खेर अडचणीत

शहर : देश

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुलांना घोषणा द्यायला लावल्यामुळे भाजपाच्या उमेदवार किरण खेर अडचणीत सापडल्या आहेत. किरण खेर यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठविली असून 24 तासांत उत्तर देण्यास सांगितले आहे. आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक अधिकारी अनिल गर्ग यांनी ही नोटीस पाठविली आहे. किरण खेर यांनी एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये मुले घोषणा देत आहे. तसेच, नगरसेवक मदेश इंद्र सिद्धू मुलांसोबत आहेत. वोट फॉर किरण खेर, अबकी बार मोदी सरकार, अशी घोषणा या व्हिडीओत येत आहेत. तर, किरण खेर यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, वोट फॉर किरण खेर, अबकी बार मोदी सरकार.. मुले देवाची रूपे असतात.याप्रकरणी निवडणूक आयोगाने किरण खेर यांना नोटीस पाठविली आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड अॅक्टनुसार ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या अॅक्टनुसार अधिकारी किंवा राजकीय पक्ष कोणत्याही मुलाला निवडणुकीच्या कार्यक्रमात सामील करु शकत नाही. दरम्यान, याप्रकरणी किरण खेर यांनी माफी मागितल्याचे समजते.

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला दिलसेंदिवस रंगत येत आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.

मागे

मायावती यूपीतल्या गुंड, निवडणुकीनंतर तुरुंगात जातील - बृजभूषण शरण सिंह
मायावती यूपीतल्या गुंड, निवडणुकीनंतर तुरुंगात जातील - बृजभूषण शरण सिंह

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, राजकीय नेतेही एकमेकांवर टीक....

अधिक वाचा

पुढे  

आपचे नेते अरविंद केजरीवालांच्या पुन्हा कानशिलात लगावली; रोड शोमधील प्रकार
आपचे नेते अरविंद केजरीवालांच्या पुन्हा कानशिलात लगावली; रोड शोमधील प्रकार

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या एका रोड शो दरम्....

Read more