By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 21, 2019 03:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण खात्याच्या समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत एकूण २१ सदस्य आहेत.
प्रज्ञा सिंह ठाकूर या मध्य प्रदेशातील भोपाळ मधील भाजपच्या खासदार आहेत. मात्र वारंवार वादग्रस्त विधाने करून खळबळ उडवून देणार्या म्हणून प्रज्ञा सिंह ठाकूर ओळखल्या जातात. त्यामुळे संरक्षण खात्याच्या समितीत त्यांची वर्णी मागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय या समितीत मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या नेत्यांचाही समावेश आहे
महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम अखेर ठरला आहे. त्यानुसार बुलेट ट्रेन ....
अधिक वाचा