By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 01:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
अलीकडे भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीवर नेमणूक करण्यात आली होती. तथापि, नथुराम गोडसे देशभक्त होता. असे वादग्रस्त व्यक्तव्य त्यांनी संसदेत केले होते. यावरून बराच वाद झाल्याने अखेर त्यांना या समितीतून काढून टाकल्याची माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिली आहे.
काल बुधवारी संसदेत एसपीजी विधेयकावर चर्चा सुरू होती. द्रमुक पक्षाचे खासदार क.राजा संसदेत बोलत होते. तेव्हा महात्मा गांधीच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करून क.राजा यांनी नथुराम गोडसेचा उल्लेख केला. तेव्हा नथुराम गोडसे देशभक्त होता, असे खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या. त्यामुळे संसदेत चांगला गदारोळ झाला. विरोधकांनी त्यावर जोरदार आक्षेप नोंदवला. त्यामुळे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वक्तव्य पटलावरुण वगळले. तर प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या या वक्तव्यावर भाजपनेते संतप्त झाले. त्यांनी प्रज्ञा सिंह ठाकुर यांची सल्लागार समितीवरून उचलबांगडी केली. शिवाय आगामी भाजपची जी संसदिय बैठक होणार आहे. त्यातही प्रज्ञा सिंह ठाकूर यांना स्थान नसेल, असेही जे.पी.नड्डा यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आवराआवरीला सुरुवात ....
अधिक वाचा