ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आरएसएस ही दहशतवादी संघटना,युद्धात वापरली जाणारी सर्व हत्यारे त्यांच्याकडे- आंबेडकर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 21, 2019 03:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आरएसएस ही दहशतवादी संघटना,युद्धात वापरली जाणारी सर्व हत्यारे त्यांच्याकडे- आंबेडकर

शहर : सांगली

आरएसएस ही दहशतवादी संघटना असून युद्धात वापरणारी सर्वच हत्यारे त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे देश विचित्र वळणावर आहे, लोकशाही धोक्यात आहे, अशी टीका, वंचीत बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे सांगली मध्ये आयोजित करण्यात आलेल्या वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचार सभेत आंबेडकर ते बोलत होते. यावेळी त्यांनी साध्वी प्रज्ञावर तिच्या वादग्रस्त विधानावरुन निशाणा साधला. साध्वीला उमेदवारी देणे म्हणजे लोकशाहीची घृणा केल्यासारखे आहे, अशा नालायक सरकारला परत सत्तेवर बसू देऊ नका असे प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले. पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध आम्ही उघडे करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आता डाकू सरकार आहे, अशा डाकूंपासून सावध रहा असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. कर भरणारी आणि दुसरी काळी अशा दोन अर्थ व्यवस्था असल्याचे सांगत नोटबंदीच्या नावाखाली, मोदींने काळ्या अर्थ व्यवस्थेवर डल्ला मारल्याचा आरोपही त्यांनी लगावला आहे.

सुषमा स्वराज्य यांनी सर्जिकल स्ट्राईक मध्ये कोणीही मारलं गेले नव्हते असे विधान केले आहे. खोटे आकडे सांगितल्यामुळे, संपूर्ण जगात आपल्या देशाची बदनामी होत होती. ती बदनामी सुषमा स्वराज्य यांनी खरे सांगून थांबवली. त्याबद्दल सुषमा स्वराज्य यांचे मी जाहीर आभार मानतो, असेही प्रकाश आंबेकडकर यांनी म्हटले.

मागे

अभिनंदन यांना सोडले नसते तर 'पाक'साठी 'कत्ल की रात' असती- पंतप्रधान
अभिनंदन यांना सोडले नसते तर 'पाक'साठी 'कत्ल की रात' असती- पंतप्रधान

अभिनंदन यांना सोडा नाही तर पाकिस्तानसाठी कत्ल की रात असेल अशी धमकीच पाकिस्....

अधिक वाचा

पुढे  

मोदींकडून वारंवार होत आहे आचारसंहितेचं उल्लंघन - माजी निवडणूक आयुक्त
मोदींकडून वारंवार होत आहे आचारसंहितेचं उल्लंघन - माजी निवडणूक आयुक्त

नरेंद्र मोदी सतत आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे दु....

Read more