By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 06, 2019 02:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
येत्या १७ जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मुंबईतील ताडदेव येथील एम.पी.मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता दोषी असल्याचा ठपका लोकायुक्त न्यायमूर्ती एम.एल. ताहलीयानी यांनी आपल्या चौकशी अहवालात ठेवला आहे. लोकायुक्तांच्या या अहवालामुळे प्रकाश मेहता त्यांचे मंत्रीपद धोक्यात आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ताडदेव येथील एम. पी. मिल कंपाऊड एसआरए प्रकल्पाला मंजूरी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा प्रकाश मेहता यांनी या प्रकरणाच्या फाईलवर मारला होता.
प्रकाश मेहता यांनी मंत्री म्हणून आपली जबाबदारी निष्पक्ष पार पाडली नसल्याचा ठपका लोकायुक्तांचा चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. एम. पी मिल एसआरए प्रकल्प मंजूर करून विकासक ए. डी. कार्पोरेशनला ५०० कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्याचा प्रकाश मेहतांचा उद्देश होता, असा आरोप विरोधकांनी हा घोटाळा उघडकीस आणताना केला होता. जुलै २०१७ रोजी मुंबईत पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा घोटाळा समोर आणला होता. या घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहतांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथविधी 30 मेच्या संध्या....
अधिक वाचा