ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर, अफवा न पसरवण्याचं कुटुंबाकडून आवाहन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2020 01:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर, अफवा न पसरवण्याचं कुटुंबाकडून आवाहन

शहर : देश

ब्रेन क्लॉट सर्जरीनंतर भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे मात्र स्थिर आहे. या दरम्यान त्यांच्या मृत्यूविषयी अफवा पसरत आहेत. यावर त्यांच्या कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पण फेक न्यूज पसरवू नका असं आवाहन केलं आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना नवी दिल्लीतल्या लष्कराच्या आर अॅंड आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मष्ठा यांनी सांगितलं आहे की, वडिलांची प्रकृती चिंताजनक जरी असली तरी कृपया खोट्या बातम्या पसरवू नका आणि मला फोन देखील करू नका. कारण हॉस्पिटलच्या अपडेट मिळण्यासाठी मला माझा फोन फ्री ठेवावा लागत आहे.

शर्मिष्ठा यांनी काल एक ट्वीट केलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "गेल्या वर्षी 8 ऑगस्टला माझ्या वडिलांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता, तो माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता. बरोबर एक वर्षाने 10 ऑगस्टला त्यांची तब्येत खूपच बिघडली. त्यांच्यासाठी जे योग्य आहे तेच देवाने करावे, त्याचबरोबर मला दुःख आणि आनंद समान पद्धतीने स्वीकारण्याची ताकद द्यावी. मी सर्वांचे आभार मानते."तर प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी म्हटलं आहे की, माझ्या वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्याबद्दल कुणीही अफवा पसरवू नयेत.

 

मागे

राष्ट्रवादीचे नेते राजू बापू पाटील यांचे निधन, दहा दिवसात कुटुंबातील तिघांना काळाने हिरावले
राष्ट्रवादीचे नेते राजू बापू पाटील यांचे निधन, दहा दिवसात कुटुंबातील तिघांना काळाने हिरावले

राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रा....

अधिक वाचा

पुढे  

Navneet Rana Corona | खासदार नवनीत राणा नागपूरहून मुंबईला, लीलावतीत उपचार होणार
Navneet Rana Corona | खासदार नवनीत राणा नागपूरहून मुंबईला, लीलावतीत उपचार होणार

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या उपचारासाठी नागपूरवरुन मुंबईला रवाना ....

Read more