ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक, मुलगी शर्मिष्ठाने केल भावनिक ट्विट

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2020 06:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक, मुलगी शर्मिष्ठाने केल भावनिक ट्विट

शहर : देश

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांच्या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. शर्मिष्ठाने ट्विट केले आहे की, तिच्या वडिलांना अगदी एक वर्षापूर्वी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता आणि आता एक वर्षानंतर ते गंभीर आजारी आहे.

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट केले की, 'माझ्या वडिलांना भारतरत्न म्हणून गौरविण्यात आल्याने मागील वर्षी ऑगस्ट हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस होता. अगदी एक वर्षानंतर १० ऑगस्टला ते गंभीर आजारी पडले आहेत. देव त्यांच्यासाठी सर्व काही चांगले करु दे आणि मला जीवनातील सुख आणि दु: दोघांबाबत समान पद्धतीने स्वीकारण्याची शक्ती दे. त्यांची चिंता व्यक्त करणाऱ्यांचे  मी मनापासून आभार मानते.

विशेष म्हणजे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी यांना सोमवारी दुपारी सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि  शस्त्रक्रिया होण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सोमवारी, माजी राष्ट्रपतींच्या मेंदूत शस्त्रक्रिया झाली, त्यांच्या मेंदूत रक्ताची गुठळी जमली होती. तथापि, अद्याप त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसलेली नाही आणि परिस्थिती नाजूक होत गेली आहे.यापूर्वी रुग्णालयाने म्हटले होते की, माजी राष्ट्रपतींना १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी :१२वाजता गंभीर परिस्थितीत दिल्ली कॅन्टोन्मेंट येथील लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की त्याच्या मेंदूत एक मोठा गाठ आहे, ज्यासाठी त्यानी आपत्कालीन व्हेंटिलेटर शस्त्रक्रिया केली आहे. पण या शस्त्रक्रियेनंतरही प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर आहे.

 डॉक्टरांची विशेष टीम सतत माजी राष्ट्रपतींच्या आरोग्याची काळजी घेत आहे. तत्पूर्वी, प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी ट्वीट केले की कोरोना तपासणीत त्यांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे आणि गेल्या आठवड्यात त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी क्वारंटाई व्हावे आणि त्यांनी कोविड-१९ ची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले होते.

 

मागे

बेळगावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला, पाच पुतळे उभारणार
बेळगावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला, पाच पुतळे उभारणार

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा व....

अधिक वाचा

पुढे  

एसटी सेवा, सार्वजनिक बससेवा सुरु करा, वंचितचं राज्यभर 'डफली बजाव' आंदोलन
एसटी सेवा, सार्वजनिक बससेवा सुरु करा, वंचितचं राज्यभर 'डफली बजाव' आंदोलन

केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तय....

Read more