By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2019 11:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग शरद पवारांनी मोकळा केला. उद्धव ठाकरेंसाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी शब्द टाकल्याचं सांगण्यात येतंय. ७९ वर्षाच्या पवारांना खुर्चीवरुन उठा-बसायला त्रास होतो, त्यावेळी त्यांच्या मदतीला गेल्या काही दिवसांत हात द्यायला उद्धव ठाकरे होते हे आपण पाहीलं. आता उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शरद पवारांनी पक्की केली हे देखील महाराष्ट्राने पाहीलं. गेला महिनाभर सुरु असलेल्या या सत्तानाट्याचा स्पष्ट निकाल जनतेला आज दिसला. यात शरद पवार हे किंगमेकर ठरले.
पवार नक्की काय करणार ? पवार शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवणार का ? पवार शिवसेनेचा गेम करणार का ? अशा चर्चा रंगलेल्या असताना शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंची खुर्ची सगळ्यात बळकट केली. या सगळ्याची मेख भूतकाळाच्या एका प्रसंगात दडली आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत गुंता वाढलेला असताना शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी या घटनेची शरद पवारांना आठवण करुन दिली अशी चर्चा आहे. आपल्या मुलीला तिच्या करिअरच्या सुरुवातीला बाळासाहेबांनी मदत केली. आता बाळासाहेबांचा मुलगा एकटा असताना आपण त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं, असं प्रतिभाताईंनी पवारांना सांगितलं. त्यानंतर पवारांचा निर्धार आणखी पक्का झाला आणि पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा चंगच बांधला.
त्यामुळेच पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांच्या भेटीत भाजपच्या ऑफरलाही पवारांनी नकार दिला अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राजकारण बहुतांश वेळा शत्रूत्वावर सुरूच राहतं पण कधीतरी राजकारणातली मैत्री ही चक्क राजकारणाची दिशा ठरवू शकते आणि मुख्यमंत्रीही बनवू शकते याचं पवार-ठाकरे मैत्रीचा हा नवा अध्याय हे उत्तम उदाहरण आहे.
बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द....
अधिक वाचा