ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 16, 2019 12:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर

शहर : मुंबई

            मुंबई – शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नागपूरात पहिलेच अधिवेशन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत भाजपचा आवाज कोण बुलंद करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता भाजपने ही जबाबदारी प्रवीण दरेकर यांच्यावर सोपविली असून विधानपरिशदेच्या विरोधी पक्षनेतेपदी ते विराजमान झाले आहेत. 


          दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपचे आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे आघाडीवर होती. मात्र, अखेरच्या क्षणी प्रवीण दरेकर यांनी या शर्यतीत बाजी मारली. गेल्या टर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी होते. त्यांनी वेळोवेळी सरकारला धारेवर धरले होते. त्यामुळे आता प्रवीण दरेकर यांनी ही कामगिरी कितपत जमणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. आजच्या अधिवेशनात भाजपने ठाकरे सरकारला घेरण्याची रणनीती आखली असून महाराष्ट्रातील शिवस्मारक, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सावरकरांचा मुद्द्यावरून भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे. 


           शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीत पाऊल ठेवणारे प्रवीण दरेकर काही काळ मनसेत होते. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी मनसेतून भाजपात प्रवेश केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने त्यांना तिकीट मिळाले नव्हते.
 

मागे

वीर सावरकर यांचा अपमान शिवसेना सहन करणार नाही – संजय राऊत
वीर सावरकर यांचा अपमान शिवसेना सहन करणार नाही – संजय राऊत

            मुंबई - वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नाहीत तर देशाचे दैवत आह....

अधिक वाचा

पुढे  

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीपाठोपाठ मुंबईतही निदर्शने
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीपाठोपाठ मुंबईतही निदर्शने

           मुंबई - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पूर्वोत्तर राज्य, ....

Read more