By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 21, 2019 03:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर निराश झालेल्या ठाण्यातील कार्यकर्ता प्रवीण चौगुले या तरुणाने जाळून घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.मनसे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या जवळचे अशी प्रवीणची ओळख होती. ठाण्यातील विटावा भागात प्रवीण राहात होता. राज ठाकरे यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मी दुखावलो असून आत्महत्या करतोय, असे प्रवीणने त्यांच्या मित्रांना सांगितले. त्याप्रमाणे रात्री त्याने स्वतःला पेटवून घेतले. त्यांनी आत्महत्या केल्याचे कळताच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह कळव्यातील शिवाजी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रवीण काल दिवसभरात त्यांच्या फेसबूकवर राज ठाकरेंच्या समर्थनार्थ आणि ईडीच्याविरोधात अपशब्द वापरुन अनेक पोस्ट लिहिल्या आहेत. तो ठाण्यातील कट्टर मनसैनिक होता. मनसेच्या अनेक कार्यक्रमात , मोर्चा किंवा आंदोलनात प्रवीण सहभागी असायचा. प्रत्येक मोर्चात प्रवीण मनसेचा झेंडा शरीरावर रंगावायचा. त्याच्या आत्महत्येमुळे मनसैनिकाना मोठा धक्का बसला आहे.
आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयान....
अधिक वाचा