ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 12, 2019 06:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

शहर : मुंबई

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षात राज्यात राष्ट्रपती लागू करण्याचे आदेश राष्ट्रपतींकडून देण्यात आलेत राष्ट्रपतींच्या आदेशानंतर ही घोषणा करण्यात आलीय. महाराष्ट्राच्या इतिहासात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येतेय. धक्कादायक म्हणजे, सोमवारी सायंकाळी खुद्द राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बोलावून मंगळवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याची मुदत दिल्याचं सांगितलं होतं. मात्र, आज सायंकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा करण्यात आलीय.

राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी राज्यपालांना फोन करून सत्तेचा दावा करण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणारं पत्रं धाडलं होतं. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३५६ नुसार केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर केल्याची माहिती राजभवनानं दिलीय. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३५६ नुसार अहवाल सादर करण्यात आला होता. याबद्दल खुद्द राज्यपालांनी ट्विटरद्वारे माहिती दिली होती.

निकाल लागून २० वा दिवस उजाडला तरी महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा घोळ संपलेला नाही. त्यामुळे, राज्यपालांच्या शिफारस पत्रानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

 

 

मागे

राज्यपाल कोश्यारी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात; शिवसेनेचा आरोप
राज्यपाल कोश्यारी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात; शिवसेनेचा आरोप

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात, असा घणा....

अधिक वाचा

पुढे  

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर देशाचं लक्ष
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर देशाचं लक्ष

महाराष्ट्रात सत्ता नाट्यामध्ये आता हालाचालींना मोठा वेग आला आहे. सध्याची स....

Read more