By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 25, 2019 05:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सत्ता स्थापन करताना शिवसेना ९५च्या फॉर्म्युल्याचा आग्रह धरण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपद मागण्याची चिन्ह दिसत आहेत. तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री करण्यासाठी विजयी उमेदवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. निकालांनंतर आता शिवसेनेत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करावे, या मागणीसाठी दबाव वाढू लागला.
विजयी आमदारांनी आज मातोश्री निवासस्थानी येत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र आदित्य ठाकरेंनाच मुख्यमंत्री करावं असा सूर विजयी आमदारांत उमटला. उद्धव ठाकरेंशी उद्या बैठक घेऊन ही मागणी केली जाणार आहे. मात्र आज भेटीआधी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदारांनी ही मागणी प्रकर्षाने मांडली. तर आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भावी मुख्यमंत्री, असे शिवसेनेचे बॅनर्स लागलेत. आदित्य ठाकरेंनी वरळीत मोठा विजय मिळवला आहे. तर शिवसेना शिवसेना खासदार संजय राऊतांनी एक फोटो ट्वीट केलाय. त्यात वाघाच्या हाती कमळ दाखवण्यात आलंय. तसंच वाघाच्या गळ्यात घड्याळही दिसतंय. व्यंगचित्रकाराची कमाल 'बुरा न मानो दिवाली है' असे कॅप्शनही राऊतांनी दिले आहे.
राज्यात युती असली तरी सिंधुदुर्ग शिवसेनेची लढाई भाजपाविरोधातच असल्याचं क�....
अधिक वाचा