By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 07:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : varanasi
लोकसभा निवडणूकीच्या वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेगा रोड शो सुरु झाला. बनारस विश्व हिंदू विद्यालयाच्या (बीएचयू) गेटवर पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी बीएचयूचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या गाडीतून रोड शोला सुरुवात केली. हा रोड शो जवळपास सात किमीपर्यंत चालणार आहे. लंका परिसरातून सुरु होणारा हा रोड शो गौदेलिया मार्गे दशाश्वमेध घाटापर्यंत जाणार आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
रोड शो झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीत सहभागी होतील. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हॉटेल डी पेरिस येथे काही महत्त्वाच्या व्यक्तींशी नरेंद्र मोदी चर्चा करणार असल्याचे माहिती मिळत आहे. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता मोदी बूथ प्रमुक आणि पक्ष कार्यकर्त्यांनी संबोधित करतील. सकाळी 11 वाजता मंदिरात जाऊन पूजा करतील आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीला सामोरे न जाता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अम....
अधिक वाचा