By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 04:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात रणशिंग फुंकणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या सभांच्या माध्यमातून चौफेर फटकेबाजी सुरू केली आहे. मनसेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असून याचा प्रत्यय नुकताच आला आहे. काँग्रेसच्या उत्तर मध्य मतदार संघाच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी नुकतीच मनसे कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी प्रिया दत्त यांचे पुष्पगुच्छ देत जोरदार स्वागत केले.
यावेळी प्रिया दत्त यांनी मनसे पदाधिकारयांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच राज यांच्या ‘मोदी मुक्त देश’ या भूमिकेला पाठिंबा दिला असल्याचे मनसेचे मुंबई पश्चिम उपनगर सचिव अल्ताफ खान यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक संजय तुर्डे, वांद्रे पश्चिम विभागाचे अध्यक्ष तुषार आफळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रिया दत्त यांची लढत भाजपच्या पूनम महाजन यांच्या विरोधात आहे. नुकतेच काँग्रेसचे दक्षिण मुंबई मतदार संघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनीही मनसे कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी मनसे-काँग्रेसच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली होती.
हरिसाल गाव तीन वर्षापूर्वी डिजिटल करण्यात आले आहे. आता तेथे काही सुविधा नसत....
अधिक वाचा