By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 01:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
उत्तर मध्य मुंबईतल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या संपत्तीत २०१४ च्या तुलनेत २४ कोटींनी वाढ झाली आहे. तर दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या संपत्तीत २० कोटींनी वाढ झाली आहे. दोघांनीही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिलीय. प्रिया दत्त उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामध्ये त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, दत्त यांच्या संपत्तीत २४ कोटींची वाढ झालीय. २०१४ मध्ये त्यांची संपत्ती ६३ कोटी ४९ लाख ३६ हजार ५२१ रुपये होती. ती आता ८७ कोटी ६१ लाख ६७ हजार ८४७ रुपये झालीय. त्यामध्ये जंगम मालमत्ता १७ कोटी ८४ लाख १ हजार १८० रुपयांची असून स्थावर मालमत्ता ६९ कोटी ७७ लाख ६६ हजार ६६७ रुपये आहे. तर, प्रिया दत्त यांचे पती ओवेन रॉनकॉन यांची जंगम मालमत्ता ५ कोटी ८५ लाख ५३ हजार १३५ रुपये तर स्थावर संपत्ती २ कोटी २५ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण मालमत्ता ८ कोटी १० लाख ५३ हजार १३५ रुपये आहे. प्रिया दत्त व त्यांच्या पतीची एकूण संपत्ती ९५ कोटी ७२ लाख २० हजार ९८२ रुपये आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीवर नाराज असलेल्या डॉ. सुजय वि....
अधिक वाचा