ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका, योगीजी, राजीनामा द्या: प्रियांका गांधी

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2020 06:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका, योगीजी, राजीनामा द्या: प्रियांका गांधी

शहर : देश

एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर योगी सरकारने हाथरसचे एसपी, डीएसपी आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यूपी सरकारच्या या कारवाई वर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी टीका केलीय. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचे फोन कॉल रेकॉर्ड सार्वजनिक करा.  पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करुन जबाबदारी झटकू नये, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रियांका गांधींनी केली.

योगी आदित्यनाथ जी काही मोहऱ्यांना निलंबित करुन काय होणार आहे? हाथरसची पीडिता, तिच्या कुटुंबाला भयानक परिस्थितीला कुणाच्या आदेशावरून सामोरे जावे लागले?, हाथरसचे जिल्हाधिकारी एसपी यांचे फोन कॉलवरील संभाषण सार्वजनिक करा.मुख्यमंत्रीजी तुम्ही तुमच्या जबाबदारीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करु नये. देश आपल्याला बघत आहे, तुम्ही राजीनामा द्या.”, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली.

हाथरसचे जिल्हा पोलीस प्रमुख विक्रांत वीर , पोलीस उपअधीक्षक तसंच पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना योगी सरकारने निलंबित केलं आहे. त्यांची नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे. तसंच हाथरस पोलीस स्थानकातील सगळ्या पोलिसांची नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे. पीडितेच्या कुटुंबाची देखील नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.

दरम्यान, हाथरस प्रकरणावरुन देशभरात संताप व्यक करण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओ ब्रायन पीडितेच्या गावाकडे निघाले असता त्यांना देखील पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गुरुवारी पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना यूपी पोलिसांनी त्यांना अडवत अटक केली होती.

मागे

बिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार
बिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसंच वि....

अधिक वाचा

पुढे  

हाथरस अत्याचार : उमा भारती यांचा योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर
हाथरस अत्याचार : उमा भारती यांचा योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर

हाथरस प्रकरणावरून भाजप (BJP) नेत्या उमा भारती (Uma Bharti) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्य....

Read more