ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'मोदीजी, धोकेबाजांना देश माफ करणार नाही'; राजीव गांधी यांच्या आरोपांवर प्रियंकांचं प्रत्युत्तर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 06, 2019 10:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'मोदीजी, धोकेबाजांना देश माफ करणार नाही'; राजीव गांधी यांच्या आरोपांवर प्रियंकांचं प्रत्युत्तर

शहर : देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर केलेल्या आरोपांना प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'शहिदांच्या नावे मतं मागून शहिदांचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांनी आपल्या बेलगाम वक्तव्याने सभ्य, निष्कलंक व्यक्तिमत्वाचा अनादर केला. अमेठीची जनता प्रत्युत्तर देईल, ज्यांच्यासाठी राजीवजींनी हौतात्म्य पत्करलं. मोदीजी, धोकेबाजांना हा देश कधीही माफ करणार नाही', असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.

काय म्हणाले नरेंद्र मोदीं?

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या रॅलीत गंभीर टीका केली. राहुल गांधी यांना उद्देशून मोदींनी वाक्य उच्चारलं. 'तुमच्या वडिलांना त्यांचे साथीदार मिस्टर क्लिन म्हणत असले तरी त्यांची ओळख भ्रष्टाचारी नंबर १ अशीच होती', अशा शब्दात मोदींनी टीकास्त्र सोडलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी बोफोर्स कथीत गैरव्यवहाराचा उल्लेख करताना हे वक्तव्य केलं. काँग्रेस आणि युपीएला केंद्रात कमकुवत सरकार आणण्यात रस आहे अशी टीका त्यांनी केली.

 

मागे

सात राज्यांमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू, जम्मू- काश्मीरमध्ये तणाव
सात राज्यांमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू, जम्मू- काश्मीरमध्ये तणाव

लोकसभा निवडणुकीच्या चव्या टप्प्यासाठीच्या मतदानाला सोमवारी सकाळी ७ वाजल्....

अधिक वाचा

पुढे  

 पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला गालबोट ,मतदानादरम्यान समाज कंटकांनी EVM फोडलं
पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला गालबोट ,मतदानादरम्यान समाज कंटकांनी EVM फोडलं

देशात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच बिहारमध्ये मतदान प्रक्रियेला....

Read more