By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 07:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे मोठा रोड शो करत कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. मात्र प्रियंका गांधी यांनी या घोषणाबाजी करणार्यांवर फुलांचा वर्षाव करत त्यांच्या विरोधाचेही स्वागत केले. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर हेच्या घोषणा दिल्या तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा देत त्याला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. प्रियंका गांधी यांनी प्रसंगावधान राखत मोदी-मोदीच्या घोषणा देणार्या भाजपा कार्यकर्त्यांवर काँग्रेसचा ध्वज आणि फुलांची उधळण करत अजून घोषणा द्या, असा टोला लगावला.
इस्रायलच्या निवडणूकीतही चौकीदार गाजतो आहे. आपल्याला असे वाटत असेल की चौकीद....
अधिक वाचा