By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 16, 2019 11:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
जम्मू काश्मीर मुद्द्यावर आंतर राष्ट्रीय पातळीवरून कोणतेच सहकार्य मिळत नसल्याचे लक्षात येताच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी कल मुस्लिमांना चिथावणी देणारी आणिजगाला धमकी देणारी विधाने केल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. काल लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयासमोर हजारो लोकांनी पाकिस्तान आणि कश्मीरचे झेंडा हाती घेऊन घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी 'कश्मीर इज बर्निंग' 'फ्री कश्मीर, फ्री हयुमिनीटी ' आणि 'मोदी : मेक टी नॉट वॉर' 'मोदी इज किलर' अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलन केल्याचे कळते.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलाम 370 भारत सरकारने हटविल्यापासून पाकचा थायथयाट सुरू आहे. पण पाकला याबाबतीत चीन व तुर्कस्तान वगळता कोणाचेच सहकार्य मिळाले नाही. तेव्हा पाक पंतप्रधान इमरान खान यांनी मुस्लिमांना चिथावणी देणारी विधाने केली. ते यासंबंधी बोलताना काल म्हणाले होते , "भारत जम्मू काश्मिरात नरसंहार घडवून आणण्याच्या तयारीत आहे. स्त्रेब्रेनिकाम मधील हत्याकांडाप्रमाणे काश्मीरतील मुस्लिमांची हत्या होऊ शकते. या प्रश्नाकडे लक्ष दिले नाहीतर जगभरातील मुस्लिमांमध्ये कट्टरता वाढून हिंसाचार सत्र सुरूच राहील, " अशी धमकी त्यांनी दिली. त्याचेच पडसाद आता उमटू लागले आहेत. नाहीतर गेल्या 10 दिवसात याबाबतीत कोणतीच प्रतिक्रिया उमटली नव्हती.
राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने भाजपनेही 'महाजन....
अधिक वाचा