By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 03:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : calcutta
निवडणुकीचा फक्त एक टप्पा बाकी आहे. अशात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी पश्चिम बंगाल पेटलं आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा फोडण्यात आला. हा प्रकार तृणमूलच्या गुंडांनी केल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. तसेच आम्ही ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पंचधातुचा पुतळा उभारू अशीही घोषणा केली. या घोषणेला ममता बॅनर्जींनी आव्हान दिलं आहे. मोदी म्हणतात की ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पंचधातुचा पुतळा उभारण्याची घोषणा मोदींनी केली. मात्र जो 200 वर्षांपासूनचा वारसा होता तो मोदी परत करू शकतात का? असा प्रश्न ममता बॅनर्जींनी विचारल आहे.
गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शाब्दिक चकमक रंगताना दिसते आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना त्यांनी याआधीही मोदींनीही त्यांच्यावर निशाणा साधला. आता ममता बॅनर्जींनी मोदी यांना उदाहरण देऊन टीका केली आहे.
तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर मोदी पुतळा फोडल्याचा आरोप करत आहेत. हा आरोप सिद्ध झाला नाही तर मोदी जनतेसमोर उठाबशा काढणार का? त्यांनी उठाबशा काढल्या नाहीत तर मी त्यांना तुरुंगात धाडेन असाही इशारा ममता बॅनर्जींनी दिला. 200 वर्षांपासूनचा वारसा मोदी परत करू शकतात का? असेही ममता बॅनर्जींनी विचारले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटं बोलत आहेत असाही आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर तुम्ही आरोप केले आहेत ते ठीक आहे. आरोप सिद्ध करून दाखवा नाहीतर मी तुम्हाला तुरुंगात धाडेन असा इशाराही ममता बॅनर्जींनी दिला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फेरफार केलेले छायाचित्र सोशल मीडियावर टाक....
अधिक वाचा