ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'मरिन ड्राईव्हवरील क्वीन नेकलेस तोडला, भराव टाकून जागाही खाणार', भाजपचा आरोप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2020 01:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'मरिन ड्राईव्हवरील क्वीन नेकलेस तोडला, भराव टाकून जागाही खाणार', भाजपचा आरोप

शहर : मुंबई

मुंबईची मुख्य ओळख असलेल्या मरिन ड्राईव्हवर सध्या काही कामासाठी बरीच तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईचा क्वीन नेकलेस अशी ओळख असलेल्या ऐतिहासिक मरिन ड्राईव्हवर काही भाग तोडला आहे. यावरुन भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

शेलार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, केंद्रातील भाजप सरकारने वीज बचत व्हावी पर्यावरण पुरक म्हणून मुंबईत एलईडी दिवे लावण्यास सुरुवात केली तेव्हा क्वीन नेकलेसची शोभा जाईल अशी ओरड करण्यात आली होती. हे जे ओरडत होते त्यांनी क्वीन नेकलेसच आता तोडला त्याचे काय? असा सवाल करत हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.

शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पुरक एलईडी दिवे मुंबईत लावले गेले. तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्वीन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला. अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच! पण..आता क्वीन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत, क्वीन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय? आता पारसी गेट तोडलाच. समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार. परिसराची शोभा घालवणार. आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप? झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड? मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या "ढोंगीपणाचा गाळ" दिसला ना अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा कोस्टल रोडचे काम गिरगाव येथे चौपाटीजवळ सुरू आहे. या कामासाठी मरिन ड्राईव्हवर सध्या बरीच तोडफोड करण्यात आली आहे.

 

मागे

युती केली ही एकच गोष्ट चुकली, नाही तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो : देवेंद्र फडणवीस
युती केली ही एकच गोष्ट चुकली, नाही तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो : देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुकीत युती केली ही एकच गोष्ट चुकली, भाजपला 150 पेक्षा अधिक जागा म....

अधिक वाचा

पुढे  

दोन्ही महापौरांशी चर्चा करुन जमावबंदीचा निर्णय घ्यावा : अजित पवार
दोन्ही महापौरांशी चर्चा करुन जमावबंदीचा निर्णय घ्यावा : अजित पवार

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंच....

Read more