ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बोरिवलीमध्ये उर्मिला मातोंडकरांच्या सभेत राडा

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 15, 2019 02:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बोरिवलीमध्ये उर्मिला मातोंडकरांच्या सभेत राडा

शहर : मुंबई

 बोरिवलीमध्ये उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार सभेदरम्यान भाजपा समर्थकांनी गोंधळ घातल्याचा आरोप होत आहे. भाजपा समर्थकांनी नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. यामुळे काही काळ त्याठिकाणी तणाव निर्माण झाला हातो. उर्मिला मातोंडकर यांनी भाजपानेच सभेत गुंड घुसवले असा आरोप केला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं की, ‘व्यवस्थित परवानगी घेऊन सभा घेत होती. अत्यंत शांत मार्गाने सभा सुरु असताना भाजपाचे गुंड लोक आले होते. त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. आमच्या लोकांनी आधी दुर्लक्ष केले. त्यांनी अश्लील, विभत्स हावभाव करण्यास सुरुवात केली. त्यांनी महिलांमध्ये दहशत पसरवण्याचे प्रयत्न केला’.
त्यांनी जाणुनबुजून महिलांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.  त्यांना पकडण्यासाठी गेले असता सगळ्यांनी पळ काढला असे सांगताना उर्मिला मातोंडकर यांनी पोलीस संरक्षण दिले पाहिजे अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी हे प्रशासन काय करत आहे, आधी असे प्रकार होत नव्हते असा सवाल विचारला. मोदींच्या नावे घोषणाबाजी करणारे सामान्य नागरिक होते असे सांगितले जात आहे. हे सगळे भाड्याचे गुंड आहेत सामान्य लोकांना यासाठी वेळ नसतो असं त्यांनी सांगितलं.ं

मागे

आझम खाननी अश्लील शब्दात केलेल्या टीकेला जया प्रदा यांचे प्रत्युत्तर
आझम खाननी अश्लील शब्दात केलेल्या टीकेला जया प्रदा यांचे प्रत्युत्तर

आझम खान यांनी माझ्याबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य माझ्यासाठी अजिबात नव....

अधिक वाचा

पुढे  

संजय राऊतांनी केला आचारसहिंतेचा भंग
संजय राऊतांनी केला आचारसहिंतेचा भंग

वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे  शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा मु....

Read more