By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 12:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीवर नाराज असलेल्या डॉ. सुजय विखे पाटलांना तिकिट न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पुत्राच्या भाजप प्रवेशानंतर आता राधाकृष्ण विखे पाटीलही लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 12 एप्रिल रोजी मुहूर्त मुक्रर करण्यात आला असून डॉ. सुजयांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरला उपस्थित राहणार आहेत. मोदी यांच्या उपस्थितीतच राधाकृष्ण विखे पाटील जाहीर सभेत पक्षप्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. पुत्र सुजय विखे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे यांची पक्षात सुरू असलेली घुसमट लपून राहिलेली नाही. सुजय विखे यांच्या प्रवेशापूर्वी जिल्हा भाजपा पदाधीका-यांना कसलीही कल्पना नव्हती. आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवेशाबाबतही नगरच्या कोणत्याच पदाधीका-याला काहीच कल्पना नसल्याचे समजते.
भाजपाकडून राज ठाकरेंवर टिका होत असताना आता राष्ट्रवादी क़ॉग्रेस राज ठाकरे....
अधिक वाचा