By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 07:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं अभिनंदन केलं. जनता मालक आहे. त्यांच्या निर्णय मान्य़ आहे. आमची लढाई विचारांशी होती. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांना मला विश्वास द्यायचा आहे की, आपल्या विचारधारेला आपल्याला जिंकवायचं आहे. काँग्रेसच्या विचारांना मानणारे देशात अनेक लोकं आहे. मी स्मृती इराणी यांचं देखील अभिनंदन करतो. त्यांनी अमेठीच्या जनतेचा प्रेमाने सांभाळ करावा. जनतेने त्यांना निवडलं आहे.माझ्यावर कितीही टीका केली. माझ्याबद्दल कितीही वाईट शब्द बोलले गेले तरी मी त्यांना प्रेमाने उत्तर देईल. मी माध्यमांचे देखील अभिनंदन केलं.लोकसभा निवडणुकीत भाजपल्या मिळालेल्या बहुमतानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली. देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या बाजुने निकाल दिला आहे. २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत भाजपला अधिक यश मिळताना दिसत आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील अमेठीमधून पराभवाचा....
अधिक वाचा