By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 03, 2019 07:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
सरतेशेवटी हो नाही करत करत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राहुल गांधी यांनी 3 जुलै रोजी अधिकृतरीत्या राजीनामा दिला. ट्वीटर वर चार पानी पत्र पोस्ट करून त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या. त्यामुळे आता गांधी कुटुंबियांचे निकटवरतीय मोतीलाल व्होरा यांच्याकडे पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सोपविले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदसाटी महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नावही चर्चेत आहे.
राहुल गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव होताच पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्षाचे अध्यक्षपद सोडले. तथापि , त्यांनीच अध्यक्षपदावर कायमराहावे , यासाठी कॉंग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे मन वळविन्याचे प्रयत्न केले . तर काहींनी राजिनामेही दिले. मात्र तरीही राहुक गांधी आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
आता तर त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा अधिकृत राजीनामा दिला आहे. साहजिकच पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारणीत नव्या अध्यक्षाची निवड होएपर्यंत पक्षाचा हंगामी अध्यक्षपदी मोतीलाल व्होरा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान मध्यंतरी पक्षाचा अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत व सुशीलकुमार शिंदे यांचीही नवे चर्चेत आली होती. त्यामुळे आता कार्यकारणी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबईत २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते ....
अधिक वाचा