By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 31, 2019 11:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
चंद्रपूर काँग्रेस लोकसभा उमेदवार बाळू धाणोरकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. चंद्रपूर आणि धामणगाव येथे अशा दोन सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 5 एप्रिलला महाराष्ट्रात येणार आहे. भाजपा केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या मतदार संघात राहुल गांधी सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. धामणगाव येथील सभेने वर्धा आणि अमरावती लोकसभा प्रभाव होईल या विचाराणे राहुल गांधी यांची सभा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात राहुल गांधी जनतेचा विश्वास जिंकरणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष लोकसभा प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार याची माहिती काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली होती.
आमच्या १०० चुका काढण्यापेक्षा काँग्रेसने स्वतःच्या १०० उपलब्धी सांगाव्या....
अधिक वाचा