By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 08:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
नांदेड, सोलापूर, इचलकरंजीनंतर राज ठाकरे यांची सातार्यात जाहीर सभा आहे. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे मोदी-शहा यांच्यावर आसूड ओढले. राज म्हणाले, की ज्या प्रमाणे मुघलांविरोधात लढण्यासाठी सर्वात आधी शिवाजी महाराजांच्या माध्यमांतून महाराष्ट्रातून आवाज निघाला तसाच आवाज मोदी-शहांविरोधात आवाज सर्वप्रथम महाराष्ट्रातून निघणार नाही तर कुठून निघणार? माझ्यासाठी शिवाजी महाराजच प्रेरणा आहेत.
उमेदवार रिंगणात नसले, तरी अन्यायाविरोधात बोलणारच असे सुरुवातीलाच स्पष्ट करत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तुफानी बरसले. पाच वर्षात जे झालं नाही ते चव्हाट्यावर मांडणारच असे राज म्हणाले.
देशातील एकाही प्रश्नाचे उत्तर मोदींनी दिले नसल्याचा घणाघात त्यांनी केला. गेल्या पाच वर्षात एकही पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत, तर तुम्हाला काय उत्तर देणार? असे नमूद करत राज यांनी मोदींवर प्रहार करण्यास सुरुवात केली.
देशात अचानक नोटबंदी घोषणा करताना आरबीआयला देखील माहित नव्हते, ना केंद्रीय ....
अधिक वाचा