ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज ठाकरेंनी आरोप सिध्द करून दाखवावा - गिरीश महाजन 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 08:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज ठाकरेंनी आरोप सिध्द करून दाखवावा - गिरीश महाजन 

शहर : मुंबई

महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अधक्ष राज ठाकरे भाजपच्या विरोधात प्रचार करत आहेत. राज ठाकरेंच्या आरोपांमुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन चांगलेच  तापले आहेत. त्यांनी आता थेट राज ठाकरेंना आव्हान  दिले आहे. राज यांनी आरोप सिद्ध केले तर मी राजीनामा देईन असे आव्हान गिरीष महाजन यांनी केले आहे. 
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाजन यांनी हे आव्हान दिले आहे. “राज ठाकरेंनी आरोप सिद्ध करून दाखवावा. मी राजीनामा देईन. फक्त बोलून आणि नकला करून चालत नाही तर कधीतरी लोकांचे प्रश्नही सोडवावे लागतात. असा टोलाही गिरीश महाजन यांनी यावेळी राज ठाकरे यांना लगावला. नांदेडच्या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी भाजपवर गुजरातला पाणी पळविण्याचा आरोप केला होता. या आरोपवरून गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना हे आव्हान दिले आहे.  गुजरातला पाणी जात असेल, हे राज ठाकरे यांनी सिद्ध केल्यास मी राजीनामा देईन, असे खुले आव्हान गिरीश महाजन यांनी दिले आहे.

मागे

मुख्यमंत्र्यांनी सांगितली हरिसालच्या त्या तरुणाची गोष्ट!
मुख्यमंत्र्यांनी सांगितली हरिसालच्या त्या तरुणाची गोष्ट!

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांवर उत्तर देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फ....

अधिक वाचा

पुढे  

लाव रे तो व्हिडिओ... सोशल नेटवर्किंगवर अनेक पोस्ट...
लाव रे तो व्हिडिओ... सोशल नेटवर्किंगवर अनेक पोस्ट...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभा निवडणुका&n....

Read more