By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 04:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
यंदाचा लोकसभा निवडणूकीचा चर्चेत आली ती मनसे प्रमुख राज ठाकरेंमुळे, ये लावरे तो व्हिडीओ म्हणत त्यांनी सत्ताधार्यांच्या अनेक योजनांची पोल-खोल केली. महाराष्ट्रात त्यांनी भाजपविरोधात 8 ते 10 सभा घेतल्या. मात्र राज ठाकरेंना आता निवडणूक आयोगाला सामोरे जावं लागणार आहे. आचारसंहितेच्या काळात एका राजकीय पक्षाने केलेल्या या सभांचा खर्च निवडणूक आयोगाने मनसेकडून मागावा, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने राज ठाकरेंना खर्च सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत आपला एकही उमेदवार नसताना राज ठाकरेंनी महाराष्टात सभा घेत मोदी शहांवर टीका केली. हे दोन माणसे राजकीय क्षितिजावरून हटवा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
दरम्यान, महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निर्वाचन अधिकारी दिलीप शिंदे यांनी राज ठाकरेंना सभांचा खर्च सादर करण्यास सांगितले आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ....
अधिक वाचा