ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विनोद तावडेंन उडवली राज ठाकरेंची खिल्ली...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 13, 2019 03:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विनोद तावडेंन उडवली राज ठाकरेंची खिल्ली...

शहर : मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो आहेत असं म्हणत विनोद तावडे यांनी राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. काल नांदेडमध्ये शो पार पडला आता लवकरच महाराष्ट्रात आणखी काही ठिकाणी त्यांचे स्टँड अप कॉमेडी शो पार पडणार आहेत असंही तावडे यांनी उपरोधाने सांगितले आहे.

राज ठाकरे सध्या मोदी आणि अमित शाह यांना संपवण्याची भाषा करत आहे. माञ, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकही खासदार नाही, एकही आमदार नाही, उरलेसुरले नगरसेवकही पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे स्वतःचा पक्ष संपलेला असताना दुसऱ्याला संपवण्याची भाषा राज ठाकरे करत आहेत असाही टोला तावडे यांनी लगावला आहे. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत स्वतः कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करत नाहीत. त्यांच्या जाहीर सभांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन करत आहेत. त्यामुळे या सभांचा खर्च त्या ठिकाणच्या उमेदवाराच्या खात्यात धरण्यात यावा अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे लवकरच करणार आहोत असेही तावडे यांनी सांगितले आहे. राज ठाकरे यांच्या जाहिर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविला गेला पाहिजे याची माहितीही निवडणूक आयोगाने जनतेला द्यावी अशी मागणीही आम्ही करणार असल्याचेही तावडेंनी म्हटलं आहे.

मागे

पार्थसाठी उदयनराजे भोसले उतरले मैदानात
पार्थसाठी उदयनराजे भोसले उतरले मैदानात

मावळ लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार पार्थ पवार निवडणूक लढवत आहे. ही न....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधानपदी मोदींपेक्षा गडकरीच बरे- अनुराग कश्यप
पंतप्रधानपदी मोदींपेक्षा गडकरीच बरे- अनुराग कश्यप

सोशल मीडियावरील कॉन्ट्रोव्हर्सी किंग अशी ओळख असलेला दिग्दर्शक अनुराग कश्....

Read more