ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बॅलेट पेपर वर निवडणुकीत भाजप जिंकलं , तर मी स्वतः जाऊन पुष्पगुच्छ  देईन  : राज ठाकरे 

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2019 04:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बॅलेट पेपर वर निवडणुकीत भाजप जिंकलं , तर मी स्वतः जाऊन पुष्पगुच्छ  देईन  : राज ठाकरे 

शहर : मुंबई

ईव्हीएम विरोधात संघर्ष करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुकीत भाजप जिंकला तर मी स्वतः जाऊन पुष्पगुच्छ देईन, असे आव्हान राज ठाकरेंनी भाजपला दिले. तसेच ईव्हीएम विरोधात येत्या २१ ऑगस्टला जो मोर्चा आयोजित केला होता तो पुरस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे मुंबईत झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली. "कलम ३७० रद्द केले म्हणून पेढे वाटता , मग देशातील ३७१ मतदारसंघात झालेल्या घोळाच काय? ईव्हीएमवर संशय आहे म्हणूनच आंदोलन करतोय. हे आंदोलन केवळ आमचं एकट्याच नाही. हार जीत होत असते. हार आम्हाला मान्य आहे. पण कोणी फसवत असेल तर काय करायचं ? काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ते मान्य केलंय. पुढे काय होणार ? याची धाकधूक सर्वानाच आहे. आरटीआय कायद्यात बदल  करून सरकारने सर्वसामान्यांचा माहितीचा अधिकारच काढून घेतला आहे. माहितीचा अधिकार केंद्र सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतलाय आणि केंद्र म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. सगळं काही हेच दोघे ठरवीत आहेत. कुठे आहे लोकशाही ? असा सवालही राज ठाकरे यांनी केला. 

कोल्हापूर-सांगली परिसरात मुख्यमंत्री वरून हेलिकॉप्टरने पाहणी करीत आहेत आणि  खालून  गिरीश महाजन सेल्फी काढत आहे. यांना कसलाही फरक पडत नाही. कारण यांना ठाऊक आहे. मतदान यांनाच होणार हा एक प्रकारचा माज आहे. भाजप मधील एका वरिष्ठ नेत्याने बाळा नांदगावकरांना सांगितले, उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे सेने, राजू शेट्टी आणि इतर एकत्र आले तरी आम्हीच जिंकणार. कारण का, तर त्यांच्याकडे मशीन नाहीत. ह्या देशातील लोकशाही जिवंत करायची असेल तर पुन्हा  मतदान मतपत्रिकेवर व्हायला हवे. निवडणूक पारदर्शी व्हायला हव्यात, असेही राज ठाकरे म्हणाले . 

मागे

व्यापार बंदीचा फटका पाकलाच अधिक
व्यापार बंदीचा फटका पाकलाच अधिक

जम्मू काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानने भारताबरोबरच्या संबधावर घाव घालीत भा....

अधिक वाचा

पुढे  

संयुक्त राष्ट्राने नाकारली मध्यस्थीची मागणी , पाकला आणखी एक झटका
संयुक्त राष्ट्राने नाकारली मध्यस्थीची मागणी , पाकला आणखी एक झटका

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलाम 370 केंद्र सरकारने हटविल्यापासून पा....

Read more