By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 04:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी घेतलेल्या मेळाव्यात सध्या सुरू असलेल्या ईडीच्या प्रकरणामागे काय नेमके कारण आहे? ह्याचा उलगडा केला आहे.
“माझी आणि पवार कटुंबियांमागे ईडी चौकशी लावण्यामागे निवडणुकीत आपल्याला कुणी आर्थिक मदत करू नये हा उद्देश आहे” असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला आहे. . “ईडीची चौकशी किंवा अन्य प्रकरणात चौकशा मागे लागल्यास उद्योगपती, देणगीदार त्यापक्षाशी संपर्क टाळतात. फोनही घेत नाहीत. त्यामुळे पक्षाला आर्थिक मदत मिळत नाही”, असंही राज ठाकरे म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी हा प्रकार उघडकीस आणला,
पक्षाला आर्थिक खच्चीकरण करून पक्ष कमकुवत करायचं आणि आपल्या विरोधकाचा जोर कमी करायचा असा नवा पायंडा राजकारणात सध्या पडत असल्याचे यानिमिताने राज ठाकरे यांनी या विधांनातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे काही अंशी दिसूनही येत आहे.
सध्या कोहिनूर मिल खरेदीप्रकरणात ईडी चौकशी झाली. तर शरद पवार यांचं नाव राज्य सहकारी बँक घोटाळ्यात आलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडनूकीसा....
अधिक वाचा