ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

VIDEO : सुंदर आणि संपन्न महाराष्ट्र हीच आपली दिशा असायला हवी

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 17, 2019 10:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30

VIDEO : सुंदर आणि संपन्न महाराष्ट्र हीच आपली दिशा असायला हवी

शहर : मुंबई

पाश्च्यात्य प्रगत राष्ट्रांमध्ये तिथल्या व्यवस्थेविषयी  सार्वजनिक मालमतेविषयी, नागरिकांमध्ये जो  आपलेपना  दिसून येतो. तो आपल्याकडे दिसत नाही. आपण आपल्या घराची जशी काळजी घेतो, ते नीटनेटके ठेवतो तसे आपण आपले शहर व राज्य असावे. अशी वर्तवणूक ठेवीत नाही. म्हणूनच आपल्याकडील तरुण तरुणी परदेशात जात असतात. त्यांना जर इथे स्वच्छ सुंदर वातावरण लाभले तर ते तिकडे जाणार नाहीत. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी काही पाश्च्यात राष्ट्रांची रचना आणि महाराष्ट्रातील सर्वच बाबतीत असलेली ओंगळवाणी स्थिति यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्याचा एक विडियो तयार केला आहे. त्यात त्यांनी जे विचार मांडले आहेत. ते सर्वांनाच उद्बोधक ठरणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ब्रिटीशांनी १२५ वर्षापूर्वी बांधलेले हे रेल्वे टर्मिनस आजही तितकेच सुंदर आणि टिकून आहे. त्याच बरोबर त्याची नोंद जागतिक वारसा म्हणून ही झाली आहे. त्यावेळची लोकसंख्या कमी असून ही आजपण ते सर्वांना सामावून घेते. त्यांनी बांधलेले ब्रिज अजूनही सुस्थितीत आहेत. न्यू यॉर्क च्या मॅनहॅटन मधील पार्क १८५७ मध्ये बांधण्यात  आलं.म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या पहिल्या लढाईच्या वेळेस.  ते पार्क आपल्या शिवाजी पार्कपेक्ष्या २८-३० पटीने मोठे आहे. पण ते इतके वर्ष जशास तसे टिकून आहे. त्याची व्यवस्था सरकार नव्हे तर सेंट्रल पार्क कॉन्झव्हेशन नावाची नागरिकांनी तयार केलेली एक स्वयमसेवी संस्था करते. तिच्याच विरोधी आपल्याकडे पहायच झाल  तर आपल्याकडे असलेल मुंबईतल संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे उद्यान मॅनहॅटन पार्क पेक्षा तब्बल ३० पटीने जास्त मोठे आहे. पण ह्या उदयानाची व्यवस्था आपण निट न ठेवल्याने उद्यानातील प्राणी आपल्यावर हल्ले करतात . उदयानाची नासधूस करून नागरिकांनी त्याचा वापर रहिवासासाठी केला आहे. तिथे अनधिकृत घरे बांधने कचरा टाकणे सरक्षक भिंती पाडणे अश्या अनुचित गोष्टी करून उदयानाचे  मोठया प्रमाणात नुकसान केल आहे.

दुसर्‍या महायुद्धात अणू बॉम्ब फेकून  उध्वस्त केलेली जपानची हिरोशिमा आणि नागासकी ही दोन शहरे आज घडीला उत्तम नगर रचना असलेली शहरे म्हणून जगाला ओळख सांगत आहेत. काही काळापूर्वी ह्या जमीनीवर माणूसकीला लाजिर वाणी वाटावी अशी कृत झाली असतील असे त्यांच्या कडे बघून वाटतही नाही कारण तिथल्या लोकांनी त्या शहराला एक वेगळी ओळख दिली आहे. अगदी त्यांच्या वर झालेल्या बॉम्ब हल्ल्यांची ही त्यांनी स्मारके बांधून लोकांना त्याकडे आकर्षित केल . शहरांना सुंदर,समृद्ध  बनवलं दुसर्‍या महायुद्धांनंतर अनेक देश पिछाडीवर पडले होते मात्र अल्पावधीतच  त्यांनी त्यावर उपाय शोधून देशाला, प्रांताला एका वेगळ्या उंचीवर नेले . स्वत:च्या राष्ट्राला प्रगती  पथावर नेण्यासाठी तिथला नागरिक झटत राहिला त्यामुळेच  मलेशिया, थायलंड, सिंगापूर, फ्रान्सं, इंग्लंड, जर्मनी, जपान हे देश नेहमी पुढे राहिले.

आपल्याकडेही इतरांसारखे खूप वारसे आहेत मात्र त्याची आपल्याला चांगली जाणीव नसल्यामुळे ते खितपत पडलेली अथवा अस्वच्छं असलेली दिसतात.  अनेक स्मारके ही कचराकुंडी म्हणूनच वापरली जातात. स्मारकांच्या भिंतीवर हातात नसलेली चित्र विचित्र कलाकुसर केलेली आढळते. हे कृत आपण राजरोस पाने करतो. आणि आपल्याला त्याची थोडी ही तमा नसते. शाळा महाविद्यालय अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आपला एक वेगळा समृद्ध वारसा सांगत असतात. पण आपल्याला त्याचे काहीच वाटत नसते.  सरते शेवटी आपण इतर देशांना छान सुंदर  मानतो मात्र आपल्याकडे तसं का नाही यावर विचार करत नाही. आणि चांगलं कोणी करत असेल तर त्याला साथ ही देत नाही कारण आपल्याला आपल अस त्यात काही वाटत नाही किंवा तसं आपण स्वता:ला वाटून देत नाही फक्त जबाबदारी आपल्यावर येइल म्हणून.

ह्या सर्व महत्वाच्या बाबींवर राज ठाकरे यांनी ह्या विडिओ वर प्रकाश टाकला आहे. ज्यावर आपल्या प्रत्येकाला विचार आणि कृती करायला हवी.

मागे

आधार जोडणी नसेल तरी अन्नधान्य मिळणार-रावसाहेब दानवे
आधार जोडणी नसेल तरी अन्नधान्य मिळणार-रावसाहेब दानवे

रेशनकार्डला आधार जोडणी नाही म्हणून कोणत्याही लाभार्थ्याला वंचित ठेवू नये, ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई वरील 26/11च्या हल्ल्यातील सुत्रधार हफिज साईद ला पाक मध्ये अटक
मुंबई वरील 26/11च्या हल्ल्यातील सुत्रधार हफिज साईद ला पाक मध्ये अटक

मुंबईत 26/11 ला झालेल्या दहशतवादी  हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार आणि जमद-उल-दावा ....

Read more