By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2019 03:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचालनालयाने चौकशीसाठी 22 ऑगस्टला हजर राहण्याची नोटीस बजावली. तेव्हापासून मनसे कार्यकर्ते संतप्त झालेत. मुंबईसह ठाणेमध्ये त्याच दिवशी बंद करण्याची तयारी करण्यात आली होती. आता मनसेचे कार्यकर्ते आक्रमक होणार अशी चिन्हे होती. तथापि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बंद करू नका, असे आवाहन केले. तसेच त्या दिवशी ईडीच्या कार्यालयाजवळ मनसे कार्यकर्ते शांततेने जातील असे त्यांनी म्हटले होते. परंतु काही तासातच स्वतः राज ठाकरे यांनी कार्यालयाच्या जवळ जमू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.
जाहीर आवाहन pic.twitter.com/nRvluMDBvh
— Raj Thackeray (@RajThackeray) August 20, 2019
यासंदर्भात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना पुढे म्हटले म्हटले आहे की, "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्यावर आणि माझ्यावर अनेक केसेस दाखल झाल्या आहेत. प्रत्येक वेळी आपण सर्वांनी तपास यंत्रणांचा आणि न्यायलयाच्या नोटिसांचा आदर केला आहे. त्यामुळे आपण ईडीच्या नोटीसीचाही आदर करू. माझ्यावर असलेल्या तुमच्या प्रेमाची मला जाणीव आहे. तरीही ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका. 22 ऑगस्टला शांतता राखा. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. तुम्हाला डीवचायचा प्रयत्न होत आहे. पण तुम्ही शांत राहा. सरकारने केलेल्या कारवाईवर योग्य वेळ येईल तेव्हा बोलेनच, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे
नुकताच भुतानचा दौरा करून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स, बहारीन आणि ....
अधिक वाचा