By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 03:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bangalore
शत्रूला धूळ चारण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या हलक्या 'तेजस' लढावू विमानातून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज भरारी घेतली. अर्धा तास त्यांनी विमान सफारी केली.
बंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनोटिक्स लिमिटेड या स्वदेशी कंपनीने तेजसची निर्मिती केली आहे. 3 वर्षापूर्वी तेजस हे लढावू विमान हवाई दलात दाखल झाले आहे. तेजस हवेतून हवेत तसेच हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्र मारा करू शकते. या विमानात बॉम्ब आणि रॉकेटही वापरण्याची सुविधा आहे. 42 टक्के कार्बन फायबर, 43 टक्के अल्युमिनियम आणि टायटेनियम या धातुपासून तेजसची बांधणी करण्यात आलेली आहे. तेजस मध्ये फक्त एकच पायलट बसू शकतो तर प्रशिक्षणासाठी असलेल्या तेजस मध्ये 2 सिटची सुविधा आहे.
विशेष म्हणजे जमीनीपासून 54 हजार किमी उंचीपर्यंत तेजस उड्डाण करू शकते. 83 तेजस विमानाची निर्मिती हिंदुस्तान एरोनोटिक्स लिमिटेड करणार असून त्यासाठी 45 हजार कोटी रूपयांचा निधि देण्यात येणार आहेत.
तेजस मधून सफरीचा अनुभव घेणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षण मंत्री आहेत.
येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर....
अधिक वाचा