By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 29, 2019 12:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रात काही दिवसांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नुकतीच स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
यापूर्वी राजू शेट्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यातच काल राणे यांची भेट घेऊन राजू शेट्टी यांनी त्यांच्याशी विविध राजकीय विषयांवर अर्धा तास चर्चा केल्याचे म्हटले जाते. राजू शेट्टी यांनी दोन वेळा राज ठाकरेंची भेट घेतली. यावरून आता विधानसभा निवडणुकीत मनसे, स्वाभिमानी यांची आघाडी हा तिसरा पर्याय पुढे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र अद्याप त्याबाबत तिन्ही नेत्यांनी कोणतेही संकेत स्पष्ट केलेले नाहीत. त्यांच्या भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
भारतासह जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच....
अधिक वाचा