By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 09, 2021 06:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आज राज्यसभेतून निवृत्त झाले. राज्यसभेत त्यांना निरोप देताना अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या काव्यमय स्टाईलने गुलाम नबी यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी गुलाम नबी यांना पुन्हा राज्यसभेत यायची विनंती केली. याशिवाय जर काँग्रेस राज्यसभेला पाठवत नसेल तर एनडीएत येण्याचं आमंत्रण रामदास आठवले यांनी गुलाम नबी यांना दिलं (Ramdas Athawale offer to ghulam nabi azad).
“तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. तुम्ही माणूस म्हणून खूप मोठ्या मनाचे आहात. तुम्ही पुन्हा राज्यसभेत यायला हवं. जर काँग्रेस पक्ष तुम्हाला परत संसदेत पाठवणार नाही तर आम्ही तुम्हाला संसदेत आणू. इथे यायला काही अडचण नाही. मी तिकडे होतो. पण इकडे येऊन गेलो. मला काही अडचण आली नाही तर तुम्हाला काय अडचण आहे?”, असं रामदार आठवले म्हणाले. रामदास आठवलेंच्या हे बोल एकूण संसदेत एकच हशा पिकला. त्यापुढे रामदास आठवले आझाद यांना म्हणाले, “तुम्ही पुन्हा संसदेत यावं, हीच आमची अपेक्षा आहे. मी आरपीआयकडून हार्दिक शुभेच्छा देतो”.
रामदास आठवलेंची कविता
राज्यसभेत रामदास आठवले यावेळी कविता म्हणाले. यावेळी अनेकांनी त्यांच्या कवितेला दाद दिली (Ramdas Athawale offer to ghulam nabi azad).
राज्यसभा छोडके जा रहे गुलाम नबी,
हम मिलते रहेंगे कभीकभी
आपका नाम है गुलाम,
इसलिए मै करता हुँ आपको सलाम
आपका नाम है गुलाम,
लेकीन आप हमेशा रहे आझाद
आप हम सभी को रहेंगे याद,
15 ऑगस्ट को भारत हुआ आझाद,
राज्यसभा से आज आप हो रहे आझाद,
आप हमेशा रहो आझाद,
हम रहेंगे आप के साथ,
ये अंदर की है बात!
मोदीची जम्मू-काश्मीर का मजबूत करेंगे हात,
और आपको देते रहेंगे साथ
गुलान नबी आझाद हे काँग्रेसमधील गांधी परिवारानंतर घेतलं जाणारं मोठं नाव आहे....
अधिक वाचा