ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

“मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा" - शरद पवार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 05:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 “मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा

शहर : सातारा

         सातारा -  “मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा, जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला." रामदास स्वामी हे काही शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, तर त्यांच्या माता जिजाऊ त्यांच्या गुरु होत्या, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाजप नेते तसेच साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना खणखणीत प्रत्युत्तर दिले.


      आज शरद पवार खटाव-माण साखर कारखान्यात पोत्यांच्या पूजन कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले की, "शिवचरित्राचा व्यवस्थित अभ्यास केल्यास जाणता राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना कधीच लावण्यात आली नव्हती."


      दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. त्यांची ऊंची कोणीही करू शकत नाही. युगपुरुष हा एकदाच जन्माला येतो आणि ते म्हणजे शिवाजीराजे. मात्र अलीकडे ‘जाणता राजा’ ही उपमाही दिली जाते. मी याचा निषेध करतो. त्या सो कॉल्ड...जाणत्या राजांना ही उपमा कुणी दिली माहीत नाही, अशी टीका भाजपचे नेते, माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अचूकपणे लक्ष वेधत केली होती. 

मागे

आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट
आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट

         नवी दिल्ली : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प....

अधिक वाचा

पुढे  

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची उंची वाढणार : मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची उंची वाढणार : मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय

         मुंबई :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उभारण्यात आलेले स्मारक दा....

Read more