By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 09:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : जालना
प्रचारात उन्हाच्या तडाख्याने भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आजारी पडले आहेत. कालपासून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत प्रदेशाध्यच आजारी पडल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महायुतीचे जालना लोकसभा मतदार संघातील उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दानवे यांच्या प्रचारार्थ मामा चौक ते कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत भाजप, शिवसेनेसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली संपल्यानंतर कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलावर दानवे यांच्या प्रचारार्थ सभा देखील घेण्यात आली.
राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशमधील बिजनौ....
अधिक वाचा