By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 31, 2019 10:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आमच्या १०० चुका काढण्यापेक्षा काँग्रेसने स्वतःच्या १०० उपलब्धी सांगाव्यात, असे आव्हान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसला दिले. काँग्रेसने शनिवारी ‘मोदींच्या १०० चुका’ असे पुस्तक प्रकाशित करत भाजपवर कुरघोडी करण्याची प्रयत्न केला आहे. या पुस्तिकेवर भाजपने प्रत्युत्तर दिले असून या भाजपच्या नव्हे तर काँग्रेसच्या चुका आहेत, असा टोला लगावला आहे. देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने देशातील दारिद्र्य निर्मूलनाचे आश्वासन दिले होते. ती आश्वासने आज राहूल गांधी देत आहेत, अशी टीकाही भाजपने या पुस्तिकेवर केली आहे. काँग्रेसने गरिबी निर्माण केली. आमच्या ज्या चुका ते सांगताहेत. त्या चुका काँग्रेसच्या अपयशामुळेच झाल्या आहेत. त्यामुळे ही आमची नव्हे, तर काँग्रेसची गुणपत्रिका आहे', अशी टीकाही मुनगंटीवारांनी या पुस्तिकेवर केली आहे.