ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आर्थिक मंदी : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार कोटी रुपये

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 27, 2019 03:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आर्थिक मंदी : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार कोटी रुपये

शहर : मुंबई

देशाच्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेकडे असणार्‍या अतिरिक्त रकमेतून केंद्र सरकारने पैसे मागितले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या शेवटच्या काही दिवसात याविषयीच्या घडामोडीवरून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्यात मतभेद झाले होते. त्यावरच तोडगा काढण्यासाठी जालान समितीची स्थापना करण्यात आली होती. सगळे खर्च केल्यानंतर ही आरबीआयकडे 3 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम होती. विकास कामाच्या योजनांसाठी ही रक्कम वापरता यावी यासाठी सरकार आग्रही आहे मात्र ही रक्कम देण्यास ऊर्जित पटेल यांचा विरोध होता. यावरून मतभेद होताच पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे म्हटले जाते.

 

मागे

सचिन अहिरांवर भाई जगतापांची मात
सचिन अहिरांवर भाई जगतापांची मात

मुंबई शहर कब्बडी असोसिएशन कार्यकारी समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोंग्....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्र्यांनी मेटे यांना रथात घेताच मुंडे भगिनी रथातून उतरल्या
मुख्यमंत्र्यांनी मेटे यांना रथात घेताच मुंडे भगिनी रथातून उतरल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बीड मध्ये दाखल होताच श....

Read more